भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात पूर्वाश्रमीचे भाजप आणि विद्यमान काँग्रेसचे मध्यप्रदेशातील आमदार संजय शर्मा यांच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र बुधवारी न येता ते गुरुवारी नागपुरात दाखल झाले आहे. झोन २ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमित शाहू व त्याच्या साथीदारांना आमदारासमोर उपस्थित केले.

हेही वाचा >>> एकतर्फी प्रेमातून तरूणीला महाविद्यालयासमोर मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांना एकत्रित बसवून पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत. चौकशी सुरू असताना सना खान यांची आई मेहरूनिसा खान यादेखील कार्यालयात उपस्थित झाल्या. एवढे दिवस पोलिसांनी नेमके काय केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचा संताप पाहता पोलीस कर्मचारी त्यांना आज घेऊन गेले असून चौकशीच्या ठिकाणी त्यादेखील उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित साहू सुमारे पंधरा वर्ष अगोदर शर्मा यांच्यासाठी काम करत होता. सना खान हत्याकांडशी माझा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणाची मला काहीही माहिती नसून याबाबत माझा काहीही संबंध नाही, असा दावा आमदार संजय शर्मा यांनी केला. पोलिसांनी मला चौकशीसाठी का बोलावले आहे याची मला कल्पना नाही असेदेखील त्यांनी सांगितले.