नागपूर : मुंबईचा काही भाग वगळून राज्याच्या बहुतांश भागात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या १० लाख ९७ हजार ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर लागले आहे. १० ऑगस्ट २०२३ रोजीच्या महावितरणच्या अहवालातील ही स्थिती आहे. त्यामुळे ग्राहकांना अचूक देयक मिळणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

महावितरणच्या अहवालानुसार राज्यातील नादुरुस्त असलेल्या १० लाख ९७ हजार ४५६ मीटरपैकी सर्वाधिक ३ लाख ६४ हजार ११२ नादुरुस्त मीटर हे महावितरणच्या कोकण विभागात ग्राहकांकडे लागले आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३ लाख ५ हजार ७४२ मीटर, नागपूर विभागात २ लाख ६६ हजार ८६१ मीटर, पुणे विभागामध्ये १ लाख ६० हजार ७१३ नादुरुस्त मीटर ग्राहकांकडे लागले आहे. महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा असल्याने हे मीटर बदलून दिले जात नाही. त्यामुळे चुकीच्या रीडिंगनुसारच ग्राहकांना देयक भरावे लागत आहे. वीज मीटरच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना खुल्या बाजारातून दुप्पट पैसे मोजून मीटर खरेदी करावे लागत आहे. नागरिकांची अशाप्रकारे लूट होण्याचे चित्र अनेक शहरांमध्ये दिसून येत आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
pune c dac marathi news, c dac campus placements marathi news
सीडॅकच्या ‘प्लेसमेंट्स’ना फटका; दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोकऱ्यांमध्ये घट

हेही वाचा – तलाठी भरती परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू…यांच्यावर कारवाई होणार

३ टक्क्यांहून अधिक ग्राहकांकडे नादुरुस्त मीटर

महावितरणच्या ग्राहकांची संख्या सुमारे ३ कोटींच्या जवळपास आहे. त्यापैकी नादुरुस्त मीटरची संख्या बघता ३ टक्क्यांहून जास्त ग्राहकांकडे नादुरुस्त मीटर असल्याचे चित्र आहे. कंपनीला नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी दरमहा सुमारे दोन लाख मीटरची गरज भासते. याशिवाय नव्या जोडणीसाठीही नवीन मीटर लागतात. त्या तुलनेत महावितरणकडून सुरू असलेल्या मीटरचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे नादुरुस्त मीटर बदलण्याच्या ऐवजी नवीन जोडणीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

नादुरुस्त मीटरची संख्या आताच सांगणे शक्य नाही. परंतु, उपमुख्यमंत्री व महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नादुरुस्त मीटरचा विषय गांभीर्याने घेतला आहे. हे मीटर शक्य तेवढ्या लवकर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. – भरत पवार, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

हेही वाचा – १४ वर्षांनंतरही वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाचे काम रखडलेलेच; विद्युतीकरणाची अद्याप निविदा नाही

महावितरणच्या नादुरुस्त मीटरची स्थिती

१० ऑगस्ट २०२३

……………………………

रिजन आणि मीटर

…………………………….

नागपूर – २.६६ लाख

औरंगाबाद – ३.०५ लाख

कोकण – ३.६४ लाख

पुणे – १.६० लाख

केंद्राच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात स्मार्ट मीटर लावायचे आहे. मात्र, ते आवश्यक संख्येने महावितरण उपलब्ध करत नसल्याने राज्यात १०.९७ लाख नादुरुस्त मीटर बदलले जात नाही. नादुरुस्त मीटर बदलत नसल्याने ग्राहक वीज कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. या पद्धतीचा मीटरचा घोळ घालून महावितरणला बदनाम करून खासगी कंपनीला वीज वितरणाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न आहे का, हा संशय आहे. – कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्ट्रेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.