नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाची तारीख जाहीर करायची व ऐनवेळी ती रद्द करून अधिवेशन मुंबईतच घ्यायचे ही दोन वर्षांपासून महाविकास आघाडीने सुरू केलेली परंपरा नागपूर येथे २८ फेब्रुवारीपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करून कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाविषयी विद्यमान सरकारचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याची प्रतिक्रिया राजकीय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची तरतूद नागपूर करारामध्ये आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून दोन वर्षांपासून करोनाचे नाव पुढे करून अधिवेशन घेणे टाळले जात आहे. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या जातात, विधिमंडळ सचिवालय अधिवेशनासाठी नियोजन करते, पण तारीख जवळ येताच वेगवेगळी कारणे पुढे करून नागपूरचे अधिवेशन रद्द केले जाते. दोन वर्षांपासून हेच सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे त्याचे ताजे उदाहरण ठरावे, २०२१ मध्ये हिवाळी अधिवेशन ऐनवेळी रद्द करण्यात आले. तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपुरात घेण्याची घोषणा करण्यात आली होती व त्यासाठी विधिमंडळ सचिवालय १६ फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार होते, हे येथे उल्लेखनीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील विधिमंडळात संयुक्त सभागृहाच्या बैठकीसाठी जागा नसल्याने अधिवेशन मुंबईतच घेतले जाणार आहे. मात्र नागपूर विधानभवनात विविध गॅलरीमधील आसन व्यवस्था लक्षात घेतली तर या समस्येवर मात करणे शक्य होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्य मंत्रिमंडळात विदर्भाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्रीही याबाबत गप्प असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत सहा वेळा नागपुरात अधिवेशन झाले नाही. त्यात ९६२,१९६३,१९७९,१९८५, २०२०,२०२१ या वर्षांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government budget session is also in mumbai zws
First published on: 10-02-2022 at 02:38 IST