नागपूर: महाराष्ट्रातील गृहनिर्माण प्रकल्पांपाठोपाठ महारेराकडील नोंदणीकृत एजंटसच्या संख्या ३१ हजारांच्या जवळपास आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या राज्यांतील नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नैनिताल, गोवा, अहमदाबाद, पटना, जम्मू, इंदोर अशा सुमारे सव्वाशे ते दीडशे शहरांत महारेरा नोंदणीकृत एजंटस उपलब्ध आहे.

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे, त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नैनिताल, गोवा, अहमदाबाद, पटना, जम्मू, इंदोर अशा सुमारे सव्वाशे ते दीडशे महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.

गृहनिर्माण प्रकल्पांप्रमाणेच नोंदणीकृत एजंटसची संख्याही महाराष्ट्रात देशात सर्वात जास्त आहे. सध्या महारेराकडे ५० हजार ६७३ एजंटस नोंदणीकृत आहेत. यापैकी ३१ हजार ९८० एजंटस सक्रिय असून १८,६९३ एजंटसची नोंदणी विविध कारणास्तव महारेराने रद्द केलेली आहे.

यात नेहमीप्रमाणे मुंबई महानगरचा समावेश असलेल्या कोकणात २१ हजार ५० असे सर्वात जास्त एजंटस आहेत . त्यानंतर पुणे परिसरात ८२०५, नागपूर परिसरात १५०४, उत्तर महाराष्ट्रात ४९०, संभाजीनगर परिसरात ३४३ आणि अमरावती परिसरात २३७ एजंट नोंदणीकृत आहेत.

एजेंटची कामे ?

स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. १८ हजार ६९३ पैकी काहींनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले नाही आणि काहींनी त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण केले नाही, म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील परिसर निहाय नोंदणीकृत एजंट्सचा तपशील

कोकण- २१,०५०
मुंबई शहर- ३४५७
मुंबई उपनगर- ८३६५
ठाणे- ६७७०
रायगड- १३४०
पालघर- १०८६
रत्नागिरी- ३१
सिंधुदुर्ग- ११

पुणे परिसर- ८२०५
पुणे – ७९३१
कोल्हापूर- ८४
सातारा- ७६
सोलापूर- ७०
सांगली- ४४

नागपूर परिसर- १५०४
नागपूर- १३५७
चंद्रपूर- ५७
भंडारा- ४५
गोंदिया – ४०
गडचिरोली- ५

उत्तर महाराष्ट्र- ४९०
नाशिक- ३२४
अहिल्यानगर- ९२
जळगाव- ५३
धुळे- १९
नंदुरबार- २

संभाजीनगर परिसर- ३४३
संभाजीनगर – १३२
बीड- ७८
लातूर- ४६
नांदेड- ३७
धाराशीव- २७
परभणी – १४
जालना – ११
हिंगोली – ८

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती परिसर- २३७
वर्धा – ९५
अमरावती – ४८
अकोला – ३६
बुलडाणा – २९
यवतमाळ- २७
वाशिम – २