नागपूर : राज्यातील हवामानात आजपासून पुन्हा एकदा बदल होणार आहेत. गेल्या आठवड्यात डोकावलेला अवकाळी पाऊस आता जवळजवळ परतला असून थंडी पुन्हा परत येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

आजपासून राज्यात कोरड्या वाऱ्यांचा झोत वाढणार असून तुरळक भागात हलका पाऊसही असण्याची शक्यता आहे. किमान व कमाल तापमान पुन्हा एकदा घट होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक स्थिती होती. दरम्यान, अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आता चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर प्रदेश आणि परिसरात आहे. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि थंडीची लाट आहे. परिणामी राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय होणार आहेत.

हेही वाचा – नागपूरमध्ये मध्यरात्रीनंतर थरार, पैशाच्या वादातून भाच्यांचा खून

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. तर विदर्भात देखील चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमानात घाट होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार असून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानसह किमान तापमानात वाढ झाली होती. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमानदेखील २० अंश सेल्सिअसवर पोहचले होते. येत्या २४ तासात कमाल व किमान तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा – बिबट्याच्या रस्ते अपघातात वाढ, रेषीय प्रकल्प ठरत आहेत कारणीभूत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली असून याआधी चार ते पाच अंशांवर असणारा किमान तापमानाचा पारा १९ ते २० अंशांपर्यंत गेल्याच्या नोंदी झाल्या. मुंबईत किमान तापमान २० अंशांच्याही पुढे गेले होते. तर सांगली, सातारा तसेच बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १७ ते २० अंशांवर जाऊन ठेपला होता. महाराष्ट्रासह नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीने होणार असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब हरियाणा भागात थंडीची लाट राहणार असून राज्यात कोरडे हवामान राहणार आहे.