भंडारा : जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या गुरख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवारी, २३ जून रोजी गुडेगाव नियत क्षेत्रातील संरक्षित वनाच्या सीमेपासून अंदाजे २०० मीटर अंतरावरील शेतात घडलेली आहे. सीताराम कांबळे (४५, रा. गुडेगाव) असे मृत गुरख्याचे नाव आहे.

भंडारा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र सावरला नियतक्षेत्र गुडेगाव येथील कक्ष क्रमांक २३८ या संरक्षित वनालगत असलेल्या शेतात सुधाकर कांबळे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना ठार केले. तसेच सदर घटनेची माहिती प्राप्त होताच सहायक वनसंरक्षक वाय. बी नागुलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एच. डी. बारसागडे हे आपल्या वनक्षेत्रातील क्षेत्रीय वन कर्मचारीसह तसेच पोलीस ठाणे पवनी येथील पोलीस निरीक्षक हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह व प्राथमिक प्रतिसाद दलातील सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – वर्धा : काँग्रेसचा मोठा मासा राष्ट्रवादीच्या गळाला, हिंगणघाट क्षेत्रात काँग्रेसला झटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई, विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी. जे. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक साकेत शेंडे, सहाय्यक वनसंरक्षक रोशन राठोड यांनी मृतांच्या नातेवाईकांचे ग्रामीण रुग्णालय पवनी येथे भेट घेऊन सांत्वन केले. वन विभागाद्वारे मृताच्या पत्नीस आर्थिक मदत म्हणून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ देय असलेली रक्कम दहा लक्ष रुपयांचे धनादेश व पंधरा हजार रुपये रोख मदत करण्यात आली. सदर वाघाचा शोध घेण्याकरिता जलद कृती दल नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांना पाचरण करण्यात आलेले आहे. सदर वन्य प्राण्यावर निगराणी ठेवण्याकरिता परिसरामध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले आहेत.