scorecardresearch

Premium

नागपूर : विवाहित युवकाचा मुलीवर अत्याचार

विवाहित तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक अत्याचार केला.

married young man abuse girl
ठार मारण्याची धमकी देऊन तो सतत मुलीवर शारीरिक संबंधासाठी बळजबरी करीत होता. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : विवाहित तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैंगिक अत्याचार केला. ठार मारण्याची धमकी देऊन तो सतत मुलीवर शारीरिक संबंधासाठी बळजबरी करीत होता. अखेर त्रस्त होऊन मुलीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मोहसीन खान उर्फ औलिया कासिफ (२९) रा. तेलीपुरा, शांतीनगरविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

article about gulzar sahab selected for gyanpith award Amrita Subhash
ज्ञानपीठ आणि कापूसकोंड्या
girl was sexually assaulted
डोंबिवलीत चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
molestation
नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
thane district marathi news, 2736 crimes on woman in thane, thane woman crimes marathi news
ठाणे : महिला अत्याचार घटनांचे सत्र सुरूच, वर्षभरात महिला अत्याचारांचे २७३६ गुन्हे; लैंगिक अत्याचारांच्या ७७२ घटना

पीडित मुलगी ही पाचपावली ठाण्यांतर्गत खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. डिसेंबर २०२१ मध्ये मोहसीन आपल्या मुलाला घेऊन उपचारार्थ रुग्णालयात आला होता. या दरम्यान तरुणीशी त्याची ओळख झाली. मोहसीनने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

आणखी वाचा-वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपी सापडला साताऱ्यात

ऑगस्ट २०२२ मध्ये मोहसीन तरुणीच्या घरी गेला. ती एकटीच असल्याचे पाहून त्याने तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो तिला बिडगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथेही तिच्यावर अत्याचार केला. जिवे मारण्याची धमकी देऊन तो सतत तरुणीचे शोषण करीत होता. यामुळे कंटाळून पीडितेने कुटुंबीयांना याबाबत सांगितले. पाचपावली पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी मोहसीन विरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Married young man abuse girl adk 83 mrj

First published on: 30-11-2023 at 11:12 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×