गोंदिया : बुधवार ५ जुलैला मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचयस सर्व सदस्यांनी अजित पवार,प्रफुल पटेल असलेल्या एमईटी सभागृहातच आपली हजेरी लावली. पण हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रफुल पटेल यांचा गोंदिया भंडारात आपल्याकडे कुणी नाही ही बाब हेरून लगेच शरद पवार गटाकडून हालचाली सुरू झाल्या.

अखेर त्यांना एक माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी गळाला लागले आणि त्यांच्या गावी ५ जुन ला आंधळगाव येथे शरद पवार गटातील प्रमुख लोकांची रात्री उशिरा पर्यंत पहिली बैठक झाली.त्यात चला उठा जागे व्हा, मी साहेबांसोबत हे घोषवाक्य घेऊन आज, गुरुवारी भंडारा विश्राम गृहात एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात ज्यांना शरद पवार सोबत जायचं आहे अशांना संपर्क करण्यात आलेला आहे.

latest news मराठी बातम्या मराठी न्युज लेटेस्ट न्युज ताज्या बातम्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत गोंदिया – भंडारा दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शरद पवार यांना मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विविध राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नागरिक तरुण साहित्यिक कलाकार वकील डॉक्टर इंजिनिअर शेतकरी संघटना सामाजिक संघटना शोषित व दलित चळवळीचे कार्यकर्ते नागरिक आबाल वृद्ध यांच्या करिता भव्य बैठकीचे आयोजन भंडारा विश्रामगृहात आज दुपारी एक वाजता आयोजित केले आहे. निष्ठावंत असणाऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.