वर्धा : सध्या खासगी बँकेत भरतीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे विविध जाहिरातीतून दिसून येते. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने रिक्त जागा निघाल्या की बेरोजगार तरुणांच्या उड्या पडतात. बँकेत तर आता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर पण धाव घेत असल्याचे बँक अधिकारी सांगतात.

ही अशीच संधी चालून आली आहे. आयडीबीआय या बँकेने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ या पदासाठी भरती सूचना प्रसिद्ध केली आहे. देशभरात कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदाच्या ६७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या साठी ऑनलाईन प्रक्रिया ८ मे पासून सुरू होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २० मे २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करायचा आहे. या पदांसाठी निवड उमेदवारांची ऑनलाईन चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यक्तिगत मुलाखत, भरती पूर्व वैद्यकीय चाचणी यातील गुणवत्तेआधारे होणार आहे. लेखी परीक्षा ८ जून २०२५ रोजी देशभरात होणार आहे.

जेएएम या पदासाठी सविस्तर जाहिरात बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. सामान्य, आर्थिक कमकुवत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान ६० टक्के, एससी, एसटी उमेदवारांसाठी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संगणक प्राविण्य आवश्यक.

ही भरती एंट्री लेव्हल पदासाठी आहे. जॉईन होताना मोबदला ठरला आहे. ६ लाख १४ हजार ते ६ लाख ५० हजार रुपये दरवर्षी अ गटातील शहरात नियुक्ती झाल्यास मिळणार. एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी नंतर ओ ग्रेड दिल्या जाणार आहे. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी राहणार. त्यात सहा महिने स्टाईपेंड व दोन महिन्याचा इंटर्नशिप राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ग्रेड ओ अधिकारी वर्गासाठी पुढील पदोन्नती लागू आहे. पदोन्नती अ गटात होणार. मात्र त्यासाठी तीन वर्षाची सेवा, कार्य करताना सिद्ध उपयुक्तता व अन्य घटक विचारात घेतल्या जाणार आहे. बँकेत नौकरी हा आता परवलीचा शब्द ठरत आहे. सरकारी बँकेसोबतच आता खासगी क्षेत्रात विविध बँका स्थापन झाल्या आहेत. या खासगी बँकेचा विस्तार देशभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. सुरुवातीस केवळ मेट्रो शहरात स्थापन झालेल्या या बँका आता ग्रामीण क्षेत्रात पण विस्तार करू लागल्या आहेत. त्या क्षेत्रात भविष्य असल्याचे पाहून बेरोजगार पदवीधर बँकिंग क्षेत्रात धाव घेत आहे. त्यासाठी पात्र होण्यास तयारी केल्या जात असल्याचे दिसून येते.