नागपूर : ढगांच्या गडगडाटासह विदर्भात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या पाच मे पर्यंत हा पाऊस कायम राहील.

बंगालच्या उपसागरात पाच ते अकरा मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. पाच मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात हवेतील कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात हलका पाऊस असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री गुळगुळीत रस्ते सोडून का येताहेत हेलिकॉप्टरने?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेलंगणा, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूच्या दूरच्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी गारपीट झाली आहे. बंगालच्या उपसागरात “मोचा” चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता. हे चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला ११ मे ते १५ मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं शनिवारी रात्री या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता.