नागपूर : हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत माॅन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, अशी नांदी बुधवारी दूपारच्या सुमारास दिली. त्यामुळे पावसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केरळमध्ये माॅन्सूनच्या प्रवेशाबाबत सर्व परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ माॅन्सूनची वाट अडवत असल्याचे दिसून येत असताना हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाची शक्यता वर्तवली. हवामान खात्याने सांगितले की, अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनाऱ्यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मॉन्सून सक्रीय होण्याची परिस्थिती अनुकूल आहे. केरळ किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये गेल्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. नैऋत्य माॅन्सून साधारणपणे एक जूनला केरळमध्ये दाखल होतो. यापूर्वी हवामान खात्याने चार जूनपर्यंत माॅन्सून दाखल होणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा – फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळते? – नाना पटोले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हवामान खात्याने म्हटले आहे की, येत्या ४८ तासांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. गेल्या वर्षी माॅन्सूनने केरळमध्ये लवकर प्रवेश केला होता. गेल्या वर्षी २९ मे रोजी मॉन्सून दाखल झाला होता. यापूर्वी २०२१ मध्ये माॅन्सूनचा प्रवेश तीन जूनला झाला होता. तर २०२० मध्ये मान्सूनचा प्रवेश एकू जूनला झाला.