नागपूर: विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केले आहे. त्‍यानुसार मार्च महिन्‍यापासून टप्प्‍याटप्प्‍याने विविध शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षा होतील. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्‍यात दोन टप्प्‍यात घेतली जाईल.

विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले जात असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्‍या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.

हेही वाचा… अवघ्या दोन तासात सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण, ‘हे’ आहेत आजचे दर

यापूर्वी करोना महामारीमुळे विस्कळित झालेले सीईटी परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरळीत झाले आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण करणेदेखील यंत्रणांना शक्‍य होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संभाव्‍य वेळापत्रक

एलएलबी- (३ वर्षे) ११ ते १३ मार्च

बी.एड.- १५ ते १८ मार्च

एमबीए- २३ व २४ मार्च

एमसीए- ३० मार्च

बी. डिझाइन- ६ एप्रिल

एम. आर्क.- ७ एप्रिल

एमएचटी-सीईटी- १६ एप्रिल ते २ मे

एलएलबी -(५ वर्षे) ७ व ८ मे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बी. एस्सी. (नर्सिंग) -९ व १० मे