अकोला : राज्यपालांच्या राजीनामा प्रकरणात विरोधकांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याची काहीही गरज नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. नियमानुसार त्यांनी राजीनामा दिल्यावर तो स्वीकृत करण्यात आला, यात विरोधकांचे काहीही देणे घेणे नाही, असे भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांनंतर आता नागपूर मेट्रोची पदवीधर, पदविकाधारकांसाठी सवलत

हेही वाचा – सुनील गावसकर म्हणाले, “ती मला दिल्लीत भेटली, आम्ही एकमेकांना खूप पत्र लिहायचो!”, व्हॅलेंटाईन विकमध्ये सांगितली ‘मन की बात’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अकोल्यात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ”विरोधकांचे म्हणणे संपूर्णतः चुकीचे आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. त्या पदाला विशेष महत्त्व आहे. विरोधी पक्षाने काय म्हणावे हा त्यांचा विषय. राज्यपालांचा तसा कार्यकाळ पूर्ण झाला होता. अल्पकाळात ते गेले किंवा त्यांनी राजीनामा दिला, अशातला काही भाग नाही. मागेही राज्यपालांनी जबाबदारीतून मुक्त करा, असे बोलून दाखवले होते. आता नियमाप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला. विरोधकांनी आपण फार मोठे कर्तृत्व केले आहे”, अशा अविर्भावात राहू नये, असा टोला त्यांनी लगावला.