लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : एका १० वर्षीय मुलीला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने युवकाने जंगलात नेले. तिचे कपडे काढून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने शौचास जाण्याचा बहाणा करून थेट पळ काढला. मुख्य रस्त्यावर पोहचून दोन दुचाकीचालकाला मदत मागितली. त्या दोघांनी तिला पोलीस ठाण्यात पोहचवले. देवदुताप्रमाणे आलेल्या दोन सुरक्षारक्षकामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजता एमआयडीसीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.

will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
21 year youth arrested under pocso act for molesting 7 year old school girl
वहीमध्ये लिहिल्याने लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड ; २१ वर्षीय तरूणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा

सोनू उर्फ मोहम्मद सरफराज जहागीर आलम (२२) असे आरोपीचे नाव असून तो एमआयडीसी परिसरातील एका झोपडपट्टीत राहतो. त्याच्या वस्तीत १० वर्षीय पीडित मुलगी राहते. दोघांची तोंडओळख आहे. शुक्रवारी गणराज्यदिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना दुपारी चार वाजता जेवण करायला कार्यक्रमात गेली होती. तिथे आरोपी सोनूने तिच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेतला. तिला चॉकलेट खरेदी करून देण्याच्या बहाण्याने सायकलवर बसवले. तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. तासभर आरोपीने तिला सायकलवर परिसरात फिरवले. त्यानंतर डिंगडोह परिसरात डंपिंग यार्डपासून काही अंतरावर असलेल्या निर्मनुष्य परिसरात घेऊन गेला. तिथे जबरदस्तीने तिला अंगावरील कपडे काढायला लावले. प्रसंगावधान राखून मुलीने हुशारी दाखवून शौचास जायचे असल्यास सांगितले. आरोपी तयार झाला. शौचाच्या बहाण्याने ती मुलगी थोडी लांब गेली आणि आरोपी थोडा बेसावध असल्याचे पाहून तेथून पळ काढला. त्यानंतर पळत ती मुख्य रस्त्यावर आली आणि मदतीसाठी ओरडू लागली.

आणखी वाचा-आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार

दरम्यान त्या रस्त्यावर तिला एका शाळेचे दोन सुरक्षारक्षक जाताना दिसले. त्यांना थांबवून तिने सर्व प्रकार सांगितला.त्यांनी तिला चादरीने झाकले व एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळ गाठले. जंगलातून पळत येताना काही ठिकाणी ती अनेक ठिकाणी पडल्याने जखमीही झाली होती. पोलिसांनी प्राथमिक उपचार करून तिला घेऊन तिला तिच्या घरी आणून सोडले. हा प्रकार ऐकून तिच्या आईला धक्का बसला. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार केले आणि घटनेच्या काही तासातच आरोपीला परिसरातून ताब्यात घेतले. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने जंगलात नेल्याची कबुली दिली.