वाशीम : भाषणाने पक्ष मोठा होत नाही, त्यासाठी बूथ बांधणीपासून बळकटीकरण करावे लागते. भाषणे केल्याने पक्ष वाढत नाही. जर तसे असते तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची आढावा बैठक वाशीममध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आमदार राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना मिटकरी म्हणाले की, अजित पवार उमुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात हिंदू आक्रोश मोर्चे बंद झाले. अजित पवारांनी राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सत्तेवर आल्यानंतर यशस्वी केला. रोहित पवार केवळ पुरोगामित्वाच्या गप्पा मारतात. सुप्रिया ताई दादावर संसदेत टीका करतात. मात्र, अजित दादामुळेच ताई खासदार आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – बुलढाणा : खामगावातील दोन दुकानांना आग; लाखोंची हानी

हेही वाचा – शिंदे गटाच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादीचा पालकमंत्री! वळसे पाटील बुलढाण्याचे ‘पालक’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांच्यामुळे मी आमदार

मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात जात बघत नाही. मी माझी भाषण शैली पक्षासाठी वापरली. अजित दादांनी मला आमदार करण्याचा शब्द दिला होता. आणि त्यांनी मला आमदार करून तो शब्द पाळला. मी सामान्य कुटुंबातील, मात्र मला पक्षाने आमदार केले. ही या पक्षाची विशेष बाब आहे.