बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनाम्याच्या वादळी पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आज मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे जिल्ह्यातच असलेले जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्याकडे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा ओघ सुरूच असल्याचे वृत्त आहे.

काल मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा व राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. यामुळे विदर्भातील राष्ट्रवादीचे एक प्रमुख केंद्र असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात वादळ उठले. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी राजीनामा दिला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर शिंगणे मंगळवारी मुंबईत दाखल झाले. त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात पवारांची भेट घेतली.

हेही वाचा – वाशीम : उन्हाळा की पावसाळा? मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांनी यावेळी साकडे घातले. जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे संपर्क अधिकारी यांनीही या भेटीला दुजोरा दिला.
दरम्यान, कौटुंबिक अडचणीमुळे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील निवासस्थानी आहे. आईची प्रकृती बरोबर नसल्याने आपण काल औरंगाबाद येथे गेलो होतो. रात्री उशिरा सिंदखेडराजात पोहोचलो. आज मुंबईकडे निघणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच असून कालपासून आज दुपारी दीड वाजेपर्यंत ७० जणांचे राजीनामे मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.