नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कर्नाटकातील बेळगाव कारागृहातून १०० कोटींची खंडणी मागून त्यांचे कार्यालय बॉंम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याला बेळगाव कारागृहात स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा मिळत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकातील बेळगाव कारागृहात आरोपी जयेश ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर शशिकांत कांथा (कुल्लोड, ता. पित्तुर-कर्नाटक) हा फाशीची शिक्षा झालेला कैदी आहे. त्याने २००८ मध्ये एका ठिकाणी दरोडा टाकला आणि दोघांचा क्रूरपणे खून केला होता. त्याच्यावर आतापर्यंत १२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला २०१२ मध्ये अटक करण्यात आली तर २०१६ मध्ये जयेशला न्यायालयातने फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो बेळगाव कारागृहात शिक्षा भोगत आहे.त्याने २०१८ पासून तीन वेळा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण  पोलिसांनी मिळवले. त्याला पुन्हा अटक केली. त्याने बेळगाव कारागृहातील कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संधान साधून  स्मार्टफोन आणि इंटरनेट मिळवले.

हेही वाचा >>> “१०० कोटी द्या, अन्यथा…” गडकरींना मिळालेल्या धमकीचे प्रकरण नेमके काय?

पोलिसांना पैसे देऊन तो कारागृहातून अनेकांना धमकी देऊन खंडणी मागत होता. त्याने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता भाजपाचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बॉंम्बस्फोट करण्याची धमकी दिली. नागपूर पोलीस आयुक्तांनी गंभीर गुन्ह्याचे लगेच लोकेशन काढून गुन्हे शाखेचे एक पथक बेळगाव कारागृहात पाठवले. न्यायालयासह दोन्ही राज्याची परवानगी घेऊन जयेश कांथा याला नागपुरात आणण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> अखेर उलगडा, गडकरींना धमकीचा फोन बेळगावमधून!, गुन्हे शाखेचे पथक तत्काळ रवाना

फाशीच्या कैद्याकडून डायरी जप्त

फाशीची शिक्षा झालेल्या जयेश कांथाच्या बॅरेकमध्ये एक डायरी नागपूर पोलिसांनी जप्त केली. त्या डायरीत अनेकांचे मोबाईल आणि टेलीफोन क्रमांक असून त्याने यापूर्वी अनेकांना फोन करून धमकी दिली आहे. पोलिसांनी पैसे देऊन त्याने गेल्या अनेक दिवसांपासून तो फोन वापरत होता, अशी माहिती समोर आली आहे.

पोलीस शोधतायेत नागपूर ‘कनेक्शन’

जयेश कांथा याचे फातीमा नावाच्या युवतीशी प्रेमसंबंध होते. त्याने तिच्याशी प्रेमविवाह केला. जयेशचे नागपूरशी ‘कनेक्शन’ काय? याबाबत नागपूर पोलीस माहिती घेत आहेत. त्याने थेट नागपुरातील भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनाच का फोन केला? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile internet facility to prisoner threatened gadkari phone number of gadkari office found on google adk 83 ysh
First published on: 15-01-2023 at 15:57 IST