नागपूर : यंदाच्या वर्षातील पहिले चक्रीवादळ मे महिन्यात येण्याची शक्यता असून सहा मे रोजी ते धडकण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाच्या तयारीच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होत असून येत्या ४८ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय हवामानतज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर भारतीय हवामान खात्याने याच आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे.

दोन मे पासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होताना दिसून आला. तो आता तयार झाला असून येत्या ४८ तासात म्हणजे सहा मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्रीपासून वायव्य भारतावर ताजा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. तर सहा मे रोजी चक्रीवादळ तयार होत आहे. या दोन प्रक्रिया एकाचवेळी होत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस थांबेल असे वाटत असतानाच देशभरात पुन्हा अवकाळी पावसाचा प्रवास सुरू होत आहे. त्यामुळे वादळीवाऱ्यासह पावसाची देखील शक्यता आहे.

हेही वाचा… गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : २० गाड्या रद्द, ट्रेनच्या विलंबाची समस्या डिसेंबरपर्यंत कायम राहणार

या परिस्थितीत वाऱ्याचा वेग ५० पेक्षाही अधिक राहू शकतो. बहूतांश भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव महाराष्टावर असल्याने सहा मे पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live: शरद पवार आजही वाय. बी. सेंटरमध्ये भेटीगाठी घेणार! काय होणार निर्णय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चक्रीवादळचा प्रभाव पूर्व भारतापासून बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत पडण्याची शक्यता आहे. येमेनमधील ‘मोचा’ या बंदरावरुन या चक्रीवादळाचे नाव ‘मोचा’ असे पडले आहे.