नागपूर : भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सूनची नांदी दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात त्याने प्रवेश केला. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र तो व्यापेल अशी सुखद आशा खात्याने दाखवली, पण उष्णतेच्या झळा वाढतच चालल्या आहेत.

उष्णतेच्या लाटांनी संपूर्ण विदर्भ कवेत घेतला आहे. हवामान खाते कमाल आणि किमान तापमानात घट दाखवत असले तरी ते दिलासादायक नाही. कमाल तापमान अजूनही ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा कायम आहेत. विदर्भाला अजून काही दिवस तरी उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : ३३ हजार ३०९ अल्पभूधारक शेतकरी ई-केवायसी अभावी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीपासून वंचित

सोमवारी नागपुरात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली जी सरासरीपेक्षा अधिक आहे. तर विदर्भातील इतर शहरांमध्येही पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता. पुढचे काही दिवस ढगाळ वातावरणासह उन्हाचा त्रास कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.