कानातून थेट मनात उतरत जाणारा चिरपरिचित आवाज आणि खास ‘हरी’शैलीतील अलवार घेतलेल्या ताना अन् तिन्ही सप्तकात विहरणारा ज्येष्ठ गझल गायक हरिहरन यांच्या मखमली स्वराने रसिक मंत्रमुग्ध झाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हरिहरन यांनी सादर केेलेल्या गझलेने श्राेत्यांच्या मनाला घातलेली साद आणि रसिकांनी अक्षरश: देहभान हरपून दिलेली दाद, असा हा साेहळा तब्बल दोन तास रंगला.पद्मश्री हरिहरन यांनी कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने केली आणि त्यानंतर ‘रोजा जानेमन’सह अनेक गझल आणि चित्रपटगीते सादर केली.

यावेळी नागपूरची गायिका आर्या आंबेकर यांनी हरिहरन यांच्यासोबत काही गीते सादर केली.सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक श्याम देशपांडे यांच्या नेतृत्वातील ५० महिलांच्या समूहाने देशभक्तीपर गीते सादर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर, आयुक्त बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रमेश मंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सतीश मराठी, मनोज बाली. यावेळी हरिहरन व युवा गायिका आर्या आंबेकर यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही; हंसराज अहिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रस्त्यावर कचरा उचलणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी अतिशय दर्जेदार कार्यक्रम प्रारंभी सादर केला. खुशाल व उषा ढाक यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सेवावस्तीतील मुलांचे कौतुक केले.