वर्धा : मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी बहुतेक विद्यापीठातून शिकविल्या जात असते. मात्र आता विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल. हा अभ्यासक्रम बंद केल्याचे एका परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. मान्यताप्राप्त पदवी नसल्याने या अभ्यासक्रमास प्रवेश घेवू नये, असे सुचविले आहे. पदवी बंद झाली असली तरी काही विद्यापीठे या पदवीसाठी अर्ज मागवित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू शकते. म्हणून २०२३-२४ या सत्रासाठी एम.फिल. अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करण्यासाठी त्वरित पावले उचलावी, असे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत.
हेही वाचा : लोकजागर : बंदीमागचे ‘बाष्कळ’ सत्य!
यूजीसी नियमन कायदा २०२२ नुसार उच्च शिक्षण संस्था एम.फिल.पुरस्कृत करणार नाही. त्यामुळे ही पदवी मान्यताप्राप्त नसल्याचे निदर्शनास आणून दिले पाहिजे, असेही नमूद आहे.