प्रशांत देशमुख

वर्धा : खेडेवजा गावातील पालिकेच्या शाळेतून शिक्षण ते थेट भारतीय माहिती सेवेत दाखल. प्रत्येक टप्प्यावर अव्वल राहणाऱ्या नम्रता फलके यांचा प्रवास युवा पिढीसाठी आदर्श ठरावा.देवळी येथील फलके कुटुंबातील कन्यांचा प्रवास गावाला भूषणावह ठरावा असाच आहे. थोरली कन्या नम्रता या सद्या औरंगाबाद (संभाजीनगर) आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी निकाल लागला आणि त्या थेट भारतीय माहिती सेवेत दाखल झाल्या.

maharashtra teacher recruitment 2024 marathi news
शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर काय होणार?
julio ribeiro article praising ips officer sadanand date
लेख : आमच्या उत्तराधिकाऱ्यांपुढचा काळ अधिक कठीण!
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

न्यायालयीन प्रकरणामुळे तब्बल अडीच वर्षानंतर ही गोड बातमी समजली. वयाच्या नवव्या वर्षीच पितृछत्र हरविले. पुलगाव दारूगोळा भंडारात कार्यरत वडिलांच्या पश्चात त्यांच्या निवृत्तीवेतनावर आई चित्रा फलके यांनी संसाराचा गाडा रेटला. त्यात पूरेना म्हणून घरीच खानावळ सुरू केली. त्यात तीनही मुलींचे शिक्षण सुरू झाले. थोरली नम्रता चुणचुणीत व अभ्यासात हुशार असल्याने तिची घाैडदौड सुरू झाली. पालिकेच्या शाळेत प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षण झाले.

हेही वाचा >>>परिवहन विभागाकडून लांब पल्ल्याच्या बस चालकांची मद्य तपासणी; अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना

शाळेत या टप्प्यावर ती अव्वलच होती. बारावीच्या परीक्षेत राज्यातून इंग्रजी विषयात प्रथम आली. गावाचा लौकिक वाढवणारी पोर म्हणून गावकऱ्यांचे सहकार्य लाभत गेले. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी तिची चूणूक पाहून दीड लाख रूपयाची मदत केली. त्या आधारे पुढील शिक्षणासाठी पूणे गाठले. एसएनडीटी विद्यापिठातून भूगोल विषयात सुवर्णपदक प्राप्त केले. पुढे सोयीचे ठरत नव्हते म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठातून लोकप्रशासन व वृत्तपत्रविद्या या विषयात पदव्यूत्तर केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्वबळावर दिल्लीत दाखल झाल्या. याच दरम्यान केंद्राच्या स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या परीक्षेत आकाशवाणी अधिकारी म्हणून निवड झाली.

यात देखील राज्यातून त्या अव्वल आल्या. कार्यक्रम अधिकारी म्हणून सादर केलेल्या कार्यक्रमाबद्दल युनीसेफचा तसेच केंद्र शासनाचा पहिला योगा सन्मान प्राप्त झाला. केेंद्र शासनातील सेवा खुणावत असल्याने त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीस लागल्या. या सेवेत काही थेट परीक्षेतून तर काही अनुभवाच्या आधारे निवडल्या जातात. नम्रता यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून असलेला अनुभव सादर करत परीक्षा दिली. त्यात देखील त्या आता राज्यात अव्वल आल्या आहे.

हेही वाचा >>>“चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पहिला हक्क”, जिल्हाध्यक्ष धोटे म्हणाले…

स्वबळावर पुढे येण्याचा व घरापेक्षा कामावर निष्ठा ठेवण्याचा वडिलांनी दिलेला संस्कार आयुष्यात कामाला आल्याचे नम्रता फलके सांगतात. त्यामुळे आई, आजी व आम्ही तिघी बहिणी कष्ट करतच वाटचाल केली. आम्ही तिघीही आता नोकरी करीत असल्याने आईला दिलासा आहे. खासदार रामदास तडस व गावातील अन्य मान्यवरांनी केलेले सहकार्य विसरता येणार नाही, अशी भावना त्या व्यक्त करतात. या काळात त्यांनी विविध दैनिक व मासिकात महिला विषयक लेखन पण केले. द वायर या वेब पोर्टलवर विविध सिनेमांचे रसग्रहण करणारे स्तंभ त्यांनी लिहिले आहे. देवळीचे समाजसेवी किरण ठाकरे सांगतात की निवड झाल्याबरोबर त्यांचा पहिला सत्कार देवळीकरांनीच घेतला. आमच्या गावाला त्यांचा अभिमान आहे.