नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अतिविशिष्ट व्यक्तींची नागपूर आणि विदर्भात ये-जा असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे (रिकार्पेटिंग) काम रखडले. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा रिकार्पेटिंगला सुरुवात झाली असून पुढील तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

उड्डाण सेवा सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी धावपट्टी उत्तम स्थितीत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित विमानतळ व्यवस्थापन धावपट्टी रिकार्पेटिंगचे करीत असते. नागपूर विमानतळावर हे काम हाती घेण्यात आले. परंतु नियोजनचा अभाव तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अतिविशिष्ट व्यक्तींची वर्दळ यामुळे हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.

mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा
Metro Project, Devendra Fadnavis, Metro Project Works,
मेट्रो प्रकल्प कामांचे वेळापत्रक करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Akola Railway gate, Railway gate closed, Akola ,
अकोला : आठ दिवस रेल्वे फाटक बंद, नागरिकांना मनस्ताप
sameer app shuts down for three days due to technical issues restored
तीन दिवस बंद असलेले समीर ॲप पूर्ववत कार्यन्वित

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयच म्हणाले, प्रकरण निकाली काढण्यासाठी न्यायालयांना वेळेचे बंधन नकोच..

नागपूर विमानतळावरील हे काम लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरू झाले. त्यासाठी विमान कंपन्यांनी वेळापत्रक बदलून घेण्यात आले. विमान उड्डान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान बंद ठेवण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात अतिविशिष्ट व्यक्तींची वर्दळ नागपुरात वाढली. त्यामुळे विशेष विमान आणि हेलिकॉप्टरला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान उतरण्याची आणि उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे या काळात हे काम ठप्प पडले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पावसाळा सुरू झाला.

पावसाळ्यात हे काम होऊ शकले नाही. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आले. पण, एक महिन्यांनी विधानसभा निडणूक लागली. पुन्हा अतिविशिष्ट व्यक्तींसाठी विशेष विमान, हेलिकॉप्टरला सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान परवागनी देण्यात आली. त्यामुळे दुपारी नियमित विमानसेवा बंद होती, पण विशेष विमान उतरत असल्याने हे काम होऊ शकले नाही. परिणामी या कामाला विलंब झाला आहे.

हेही वाचा : कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गतही पत्नीला पोटगी, न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय…

आता विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हे काम २४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाले आहे. सर्व विमानांची वाहतूक सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत बंद करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात सुमारे दोन महिने काम ठप्प होते. त्यामुळे पुढील तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. यासंदर्भात नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रुही म्हणाले, रिकार्पेटिंगचे काम पूर्ण करण्यासाठी झालेला करार मे २०२५ पर्यंत आहे. त्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Story img Loader