नागपूर : भारत- पाकिस्तानदरम्यान तणावजन्य स्थिती असतांनाच सोन्याच्या दरात शनिवारी (१० मे २०२५ रोजी) सकाळी बाजार उघडल्यानंतर चार तासातच किंचित घसरण झाल्याचे दिसत आहे. अक्षयतृतीयाच्या दरम्यान सोन्याच्या दर चांगलेच खाली आले होते. परंतु त्यानंतर पून्हा सोन्याचे दर वाढले. आता तणावजन्य स्थितीत पून्हा शनिवारी दर घसरल्याने ग्राहकांच्या मनात सोन्याच्या दराबाबत संभ्रम वाढला आहे.

जम्मू कश्मिर येथील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहे. तर भारतीय सैन्याकडूनही त्याला सडेतोड उत्तर दिले जात आहे. त्यामुळे दोन्ही देशाच्या सिमेवर तणावजन्य स्थिती आहे. या पार्श्वभूमिवर नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर चार तासात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे बघायला मिळाले. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील सराफा बाजारात १० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता बाजार उघडल्यावर सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९७ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार १०० रुपये होते. त्यानंतर दुपारी २ वाजता नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर सकाळी १० वाजताच्या तुलनेत चार तासानंतर दुपारी २ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ३०० रुपये, २२ कॅरेटसाठी ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी २०० रुपये, १४ कॅरेटसाठी २०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. परंतु चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेले नाही. चांदीचे दर शनिवारी सकाळी १० वाजता आणि दुपारी २ वाजता प्रति किलो ९६ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनम धातूचे दरही प्रति १० ग्राम ४४ हजार रुपये नोंदवले गेले. दरम्यान

मध्यंतरी सोन्याचे दर १ लाखावर…

नागपुरात २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९९ हजार ४०० रुपयांवर गेले होते. दोन्ही शुल्क जोडल्यास हे दर प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांवर होते.