बेसा-घोगली मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाहन नाल्यात उलटले. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात आज (सोमवार) सकाळी आठ वाजता झाला.
१४ मुलांची क्षमता असलेल्या या वाहनात १८ शाळकरी मुलांना कोंबून शाळेत नेण्यात येत होते. बेसा घोगली रोडवर चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्यात उलटले.
नागपूर : पावसाचा कहर, विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती; ईरइ धरणाचे दरवाजे उघडले
या अपघातात चार मुले गंभीर जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
सर्व मुले सुरक्षित असून या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती बेलतरोडीचे ठाणेदार चंद्रकांत यादव यांनी दिली.