दुचाकीने कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला महापालिकेच्या ‘आपली बस’ने धडक दिली. या धडकेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. ही अपघाताची घटना सदर हद्दीतील विधानभवनाजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.जखमी अवस्थेत महिलेला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने सोमवारी त्यांना एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सुचिता बळमवार रा. बेलदारनगर, उमरेड रोड, असे ठार झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वर्ष २००८ मध्ये पतीच्या मृत्यूनंतर त्यांना अनुकंपा तत्त्वावर पोलीस विभागात नोकरी लागली होती. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. सुचिता यापूर्वी गडचिरोली येथे तैनात होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांची नागपूर पोलीस दलात बदली झाली. येथे त्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होत्या.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

हेही वाचा : सुधारगृहातून पलायन केलेल्या मुलीची रवानगी पुन्हा बालसुधारगृहात

रविवारी त्या दुचाकीने कर्तव्यावर जात होत्या. सदरमधील बाटा शोरुमजवळून जात असताना समोरून आलेल्या आपली बसने (एमएच-४०/बीएल/३८२३) त्यांना धडक दिली. दुचाकी बसमध्ये सापडली. त्यामुळे त्या चाकाखाली येता येता थोडक्यात बचावल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.