नागपूर : राज्याची उपराजधानी आणि विदर्भातील प्रमुख शहर अमरावतीच्या प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता रेल्वेने दिली आहे. या मार्गावर नोकरी, व्यावसायिक कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात अप-डाऊन करणारे लोक आहेत. त्यांच्यासाठी आता शयनयान, वातानुकूलित डब्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागपूर ते अमरावती दरम्यान १७४ किलोमीटरचे अंतर आहे. या एवढ्या कमी अंतरावर शयनयान, एसी थ्री टिअरच्या डब्यांना प्रवासी मिळत नसल्याने या इंटरसिटी एक्सप्रेसला दोन स्लीपर, एक एसी तीन टियर इकॉनॉमी आणि एक एसी चेयर कार असून कुलूप बंद करण्यात आले होते. ही डबे निव्वळ नागपूर ते अमरावती रिकामे धावत होते. राज्याची उपराजधानी नागपूर आणि अमरावतीला जोडणारी अजनी-अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेसचे हे डबे आता प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात चालवल्या जाणाऱ्या गाडी क्रमांक १२१९९/१२१२० अमरावती-अजनी-अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना आता अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर गाडी १६ एलएचबी डब्यांसह चालवली जात आहे, ज्यामध्ये दोन गार्ड-कम-लगेज व्हॅन, दोन स्लीपर कोच, एक द्वितीय वातानुकूलित डबा, एक वातानुकूलित चेयर कार व एक नॉन-एसी चेयर कारचा समावेश आहे. यापैकी चार राखीव डबे (दोन स्लीपर, एक एसी तीन टियर इकॉनॉमी आणि एक एसी चेयर कार) सध्या रिकाम्या आणि लॉक अवस्थेत धावत होते.

रेल्वे प्रशासनाने या चार डब्यांना १ऑगस्ट २०२५ पासून तीन महिन्यांच्या प्रयोगात्मक कालावधीसाठी सर्वसामान्य प्रवाशांच्या आरक्षणासाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील तसेच गाडीचा वापर वाढेल. या डब्यांसाठी आरक्षण ३१ जुलै २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. मध्य रेल्वे, नागपूर विभाग प्रवाशांच्या सुविधेला सर्वोच्च प्राधान्य देत सतत सेवा सुधारण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर ते अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, बल्लारपूर यासाठी नागपूरहून ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. परंतु त्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले नाही. वास्तविक एवढ्या अंतरासाठी चेअरकार असलेले रेल्वेगाडी चालवणे सोयीचे आहेत. परंतु शयनयान, एससी थ्री टिअर गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सुरू करून चाचपणी करण्यात येत आहे.