तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पराभव होण्याची भीती भाजपला असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर यांनी प्रभाग रचना बदलली, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचनेचा विषय मंत्रिमंडळात आला. तेव्हा आपण तीन सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला. पण, त्यावेळी शिंदे यांनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेला सहमती दर्शवली होती.

मात्र, या प्रभाग रचनेत भाजपला पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांनी रयत मुख्यमंत्री शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडी सरकारच्या प्रभाग रचनेचा निर्णय बदलला आहे, असेही राऊत म्हणाले.

नागपूर : महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक होत शुक्रवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात काही कार्यकर्ते भेंडी, कारले, कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांची माळ घालून तर हातात तेलाचे पिंप घेऊन महागाईच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.