नागपूर : एकाच महाविद्यालयात शिकत असल्यामुळे त्या दोघांची ओळख झाली. काही दिवसांतच एकमेकांशी मैत्री झाली. मात्र, मैत्री करण्यामागे युवकाचा भलताच हेतू होता. त्यामुळे तिच्यासोबत गोडीगुलाबीने वागत होता. मैत्रिणीला वाढदिवस असल्याचे सांगून नागपुरात फिरायला आणले. हॉटेलमध्ये नेले. तेथे वाढदिवसाची कोणतीही तयारी नव्हती. त्याने हॉटेलच्या खोलीत मैत्रिणीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. बळजबरी केल्यामुळे मैत्रिणीला मानसिक धक्का बसला. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबियांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन आरोपी तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. ऋषी रोडे (२१) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेडेगावात राहणारा ऋषी हा बी.ए. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून तो ऑनलाईन शेअर्स मार्केटचा व्यवसाय करतो. तर मनिषा (बदललेले नाव) ही बी.ए. प्रथम वर्षाला शिकते. दोघेही एकाच महाविद्यालयात असल्यामुळे दोघांची ओळख झाली. ऋषीने स्वतःहून मनिषाला मदत करण्याच्या नावाखाली मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघेही संपर्कात आले. ऋषी तिला मॅसेज करुन संपर्कात राहत होता. दोघांची मैत्री समोर वाढली. महाविद्यालयातही तो मनिषासोबत राहायला लागला. तिला दुचाकीने सोडून देणे किंवा बसस्थानकापर्यंत सोबत जायला लागला. ऋषीच्या मनात काही औरच असल्यामुळे तो तिचा पाठलाग करायला लागला. त्याच्या मनातील काळंबेरं तिला ओळखता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून तो नागपूरला फिरायला जाण्यासाठी तिला विचारत होता. मात्र, ती नकार देत होती. त्यामुळे तो संधीच्या शोधात होता.

हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाव कसे ठरले माहिती आहे का? आधी या नावावर झाला होता विचार

वाढदिवसाचा बहाणा आणि बळजबरी संबंध

ऋषीने ८ ऑगस्टला वाढदिवस असल्याचे मनिषाला सांगितले. वाढदिवसाची ‘स्पेशल पार्टी’ नागपुरात ठेवल्याचे तिला सांगितले. तिला पार्टीला जाण्यासाठी शैक्षणिक कागदपत्र तयार करण्याचा बहाणा सांगितला. ती मित्रासोबत नागपुरात आली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल अलोहा येथे गेली. तेथे त्याने रुम बूक केली होती. रात्री बारा वाजता केक कापणार असल्याचे सांगितले. मात्र, बारा वाजले तरी पार्टीची कोणतीही तयारी नव्हती. त्यानंतर मात्र, ऋषीने तिला वाढदिवस हा फक्त बहाणा असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, ऋषीने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा – संघाची मुहूर्तमेढ, अनेक घटनांचे साक्षीदार अन् स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा झाला उलगडा

ऋषीने बळजबरी संबंध प्रस्थापित केल्यामुळे मनिषा गोंधळली. दुसऱ्या दिवशी तिने लगेच घर गाठले. मात्र, तिच्या स्वभावात बदल झाला. ती एकटी राहायला लागली. ती भेदरल्यासारखी वागायला लागली. तिच्या मनात घालमेल सुरु होती. नैराश्यात गेलेल्या मनिषाला आईने आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर ती अचानक रडायला लागली. तिने आईला ऋषीने बळजबरी केल्याची घटना सांगितली. कुटुंबियांशी चर्चा झाली आणि पोलिसात तक्रार देण्याचे ठरले. त्यांनी प्रतापनगर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ऋषी फरार झाला. त्याचा शोध सुरु आहे.