नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे केले जात आहे. यावर्षानिमित्त येत्या १९ फेब्रुवारी रोजी येणारा शिवजयंती दिवस जिल्हाभर मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वे राज्याभिषेक वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षीची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांनी देखील आपल्यास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करावी.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा…Video : टायगर फॅमीलीची धमाल मस्ती पाहिलीय का? नाही, तर मग ताडोबाच्या जंगलातील वीरा आणि बछड्यांचा हा व्हिडिओ पाहाच…

शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, तो परिसर स्वच्छ, सुंदर करावा, कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी, विद्युत रोषणाई, रांगोळी काढावी. महाराजांचा पुतळा व परिसर स्वच्छ करावा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यगीत वाजविण्यात यावे. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेता येत असल्यास अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.