नागपूर : रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांना न्यायालयाने रस्ता मोकळा करण्यास सांगितल्याने आंदोलक संतप्त झाले आहे. ते आंदोलन करण्यावर ठाम आहे, आम्हाला कारागृहात टाका,असे बच्चू कडू यांनी सांगितले व रात्री ते आंदोलकांसह स्वत:ला अटक करून घेण्यासाठी शहराच्या दिशेने निघाले. दरम्यान सरकारने न्यायालय विकत घेतले आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी मंगळवारपासून बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी नागपूर हैदराबाद महामार्गावर ठाण मांडून बसले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांची गैरसोय झाली होती. दुसऱ्या दिवशीही हिच स्थिती होती.

नागपूर उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस आंदोलकांना हटवण्यासाठी गेले असता आंदोलकांनी त्याला विरोध केला. बच्चू कडू यांनीही आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्मयाचा आदर करीत आहो असे स्पष्ट केले. आम्हाला अटक करा,असे त्यांनाी सांगतले व रात्री ते आंदोलकांसह स्वत:ला अटक करून घेण्यासाठी नागपूरकडे निघाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले. ते म्हणाले सरकारने न्यायालय विकत घेतले आहे.