नागपूर : प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना प्रियकराने मोबाईलने अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर ते प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्या तरुणीला एका मित्राने तिचा व्हिडिओ बघितल्याचे सांगितले. त्यामुळे तिने प्रियकराचा मोबाईल बघितला असता तिला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रियकराने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मित्रांच्या व्हॉट्सअँप ग्रूपवर पाठवले होते. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने लकडगंज पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली.

युवकाविरुद्ध लकडगंज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. हर्षल अनिल ढोके (वय २२, रा. वॉर्ड क्र. ५. बसस्टॉप मागे, सावनेर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. तो बीबीएला शिकत आहे. तर जरीपटका परिसरातील पिडीत १९ वर्षाची स्विटी (बदललेले नाव) नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे.

हेही वाचा >>> धक्कादायक! मतिमंद मुलामुळे विवंचना, तणाव; आईने मुलाला फाशी देऊन स्वतः केली आत्महत्या

आरोपी हर्षल आणि स्विटीची ओळख स्विटीच्या मैत्रीणीच्या घरी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. इन्स्टाग्रामवर नियमित चॅटींग आणि फोनवर बोलणे सुरु झाल्यामुळे ते दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडले. याचा फायदा घेऊन आरोपी हर्षलने ३ मे रोजी मस्विटीला भेटण्यासाठी सी. ए. मार्गावर बोलावले. जेवण करण्याच्या बहाण्याने तो स्विटीला हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

हेही वाचा >>> नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीची नैराश्यातून आत्महत्या

 केवळ शारिरीक संबंध प्रस्थापित करूनच तो थांबला नाही तर त्याने त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर १९ मे २०२३ रोजी तो स्विटीला सावनेरला घेऊन गेला. तेथे तिच्यासोबत पुन्हा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. आरोपी हर्षलचा मोबाईल तपासताना त्याने शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार करून आपल्या मित्राला पाठविल्याचे स्विटीच्या लक्षात आले. तिने याबाबत त्याला विचारणा केली असता आरोपीने व्हिडीओ पाठविला तो आपलाच दुसरा मोबाईल नंबर असल्याचे स्विटीला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु तिला ही बाब पटली नाही. तिला शंका आल्यामुळे तिने खडसावून जाब विचारला आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर आरोपी हर्षलने तिला पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी हर्षल आपला व्हिडीओ व्हायरल करू शकतो, अशी शंका आल्यामुळे स्विटीने लकडगंज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. लकडगंज पोलिसांनी आरोपी हर्षलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.