नागपूर: करोनानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असतांनाच हे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. मागील पंधरा दिवसात २४ कॅरेटचे दर प्रति १० ग्राम ५ हजार ६०० रुपयांनी घटले होते. हे दर आणखी घसरण्याचे संकेत असतांनाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (५ मे २०२५ रोजी) सकाळी १० वाजताच्या तुलनेत दोन तासांनी सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

नागपूरसह सर्वत्र हल्ली लग्नसराईसह इतरही कार्यक्रमाची रेलचेल वाढली आहे. या कार्यक्रमासाठी अनेक कुटंबात सोने- चांदीचे दागिने खरेदी केले जात असल्याने हल्ली सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी आहे. नागपुरातील सराफा बाजारात २२ एप्रिलच्या तुलनेत ३ मे २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ५ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ५ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ४ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी ३ हजार ६०० रुपये घसरले होते. या दरात आणखी घट होण्याचे संकेत असतांना आता पून्हा दरात उलटफेर होतांना दिसत आहे.

नागपुरात सोमवारी (५ मे २०२५ रोजी) सकाळी १० वाजता सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९३ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७३ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार रुपये होते. परंतु दुपारी १२ वाजता नागपुरातील सराफा बाजारात हे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९४ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८७ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७३ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात सोमवारी सकाळी १० वाजताच्या तुलनेत दोन तासात सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी २०० रुपये, २२ कॅरेटसाठी २०० रुपये, १८ कॅरेटसाठी २०० रुपये, १४ कॅरेटसाठी २०० रुपये वाढल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीच्या दरात घसरण…

नागपुरातील सराफा बाजारात सोमवारी (५ मे २०२४ रोजी) प्रति किलो ९५ हजार ३०० रुपये होते. तर दोन तासानंतर दुपारी १२ वाजता हे दर प्रति किलो ९५ हजार रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोमवारी सकाळी १० वाजताच्या तुलनेत दुपारी १२ वाजता नागपुरात चांदीचे दर ३०० रुपयांनी घटल्याचे दिसत आहे.