नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात एक २५ वर्षीय तरुणी मूत्रपिंडाचा विकार घेऊन आली. विविध वैद्यकीय तपासणीसह सूक्ष्म निदानात तिला चक्क एका नवीन कंपनीच्या सौंदर्य प्रसाधन क्रिममुळेच मूत्रपिंडाचा विकार झाल्याचे पुढे आले. १४ मार्चला जागतिक मूत्रपिंड दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा. नागपुरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात जुलै २०२३ रोजी एक २५ वर्षीय तरुणी आली. तिच्या दोन्ही पायांवर महिन्याभरापासून सूज होती. ती वाढत असतानाच मांडी आणि पोटालाही सूज येत होती. येथील मूत्ररोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पंकज जावंधिया यांनी तिची तपासणी केली. त्यात नेफ्रोटिक सिंड्रोमची शंका होती. त्यानुसार रुग्णाची मूत्रासह विविध तपासणी केली गेली.

रुग्णाच्या मूत्रात प्रथिनांच्या गळतीचे प्रमाण चक्क १३ ग्रॅम निघाले. ही गळती सामान्यत: ०.३ ग्रॅम असते. त्यानंतर रुग्णाच्या मूत्रपिंडाची बायोप्सी केल्यावर निल १ पाॅझिटिव्ह मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी आजाराचे निदान झाले. हा मूत्रपिंडाचा कर्करोग असतो. हा आजार हर्बल औषधांचा वापर इत्यादींशी संबंधित विकार आहे. हा आजार सामान्य रुग्णांत दिसत नाही. रुग्णाला हा आजार होण्याचे कारण शोधण्यासाठी डॉ. जावंघिया यांनी संबंधिताचा इतिहास जाणून घेतला. त्यात रुग्णाने सुमारे दोन महिन्यांपासून एक बाजारातून क्रिम आणून लावणे सुरू केल्याचे पुढे आले. यावेळी रुग्णाला ताबडतोब ही क्रिम वापरणे थांबवण्यास सांगण्यात आले. या क्रिमच्या घटकांची तपासणी केली असता डॉक्टरांना त्यात बरेच हानीकारक घटक आढळले. तातडीने रुग्णावर उपचार सुरू केले गेले. रुग्णाने औषधोपचाराला चांगला प्रतिसाद दिल्याने सहा महिन्यात रुग्ण पूर्णपणे बरी झाली. परंतु, या घटनेमुळे बाजारात सर्रास कोणत्याही कंपनीच्या विक्री होणाऱ्या सौंदर्य प्रसाधने क्रिमच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. मूत्रपिंड तज्ज्ञांच्या पत्रकार परिषदेतही या विषयावर प्रकाश टाकला गेला. यावेळी मूत्रपिंड सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. मोनाली शाहू, सचिव डॉ. प्रणव कुणार झा उपस्थित होते.

Pune, Sassoon, politics,
पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल
yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

हेही वाचा : लोकजागर: पाण्यातही ‘पाप’!

मैत्रिणींच्याही पायाला सूज

सुपरच्या डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार सुरू केले होते. दरम्यान, रुग्णाच्या काही मैत्रिनींनीही या पद्धतीने क्रिम लावणे सुरू केल्यावर त्यांच्याही पायात सूज आल्याचे पुढे आले. तातडीने त्यांनाही क्रिमचा वापर थांबवायला सांगितले गेले. उपचार घेतल्यावर त्यांच्याही पायावरील सूज कमी झाली.

हेही वाचा : “भाजपाकडून हिंदुत्वाच्या केवळ गप्पा,” उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, “त्यांना शिवसेनाप्रमुखांनी…”

घातक पारायुक्त क्रिमच्या वापरामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक बनत आहे. या क्रिममध्ये कॅडमियम, कोबाल्ट, क्रोमियम इत्यादी इतर जड धातूंचे प्रमाणही जास्त राहू शकतात. अलीकडे या पद्धतीच्या क्रिममुळे मूत्रपिंड विकार वाढताना दिसतात. त्यामुळे नागरिकांनी नावाजलेले व त्यातील घटक स्पष्ट लिहिलेले ब्रांडेड क्रिमच वापरावे.

डॉ. पंकज जावंघिया, सहयोगी प्राध्यापक, मूत्रपिंड विभाग, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नागपूर.