नागपूर : कामठी मार्गावरील डबल डेकर व्हायाडक्ट हा मेट्रो व हायवे वाहतुकीसाठी ५.६३७ कि.मी. लांबीचा सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून हे स्थापत्य कलेचे अदभूत उदाहरण आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन बांधलेल्या या उड्डाणपुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डतर्फे नोंद घेतली आहे.
रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले.
यापूर्वी छत्रपतीनगर येथील ३.२ कि.मी. लांबीच्या डबल डक्ट उड्डाणपुलाची निर्मितीसाठी जागतिक स्तरावर नोंद घेण्यात आली होती. वास्तुकलेच्या या निर्मितीमुळे शहराला पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नवीन ओळख मिळाली. या पुरस्काराने नागपूरचा गौरव जागतिक स्तरापर्यंत पोहचला. या डबल डेकर पुलाच्या निर्मितीसोबतच कामठी मार्गावर रेल्वे, महामार्ग वाहतूक तसेच मेट्रो वाहतुकीसाठी जागात प्रथमच अशा प्रकारच्या उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. हे जगातील प्रमुख अभियांत्रिकीमधली आश्चर्य आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
यावेळी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, महाव्यवस्थापक यीन राठोड, विद्यासागर व्यवस्थापक प्रविण मारोती, प्रकाश मुदलियार आदी अधिकारी तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री
महामेट्रोने अल्पावधीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे नागपूर या शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केली असून या डबल डेकर पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद घेतली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.