लोकसत्ता टीम

नागपूर : दररोज व नियमित पणे मेट्रोची प्रवाशी संख्या दररोज वाढत असून अनेकदा तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. ही बाब टाळण्यासाठी मेट्रोने कॅशलेसची सुविधा सुरू कली. आता यापुढेचे पाऊल मेट्रोने नवीन व्हॉट्सअ‍ॅप तिकीट प्रणाली सुरू केली आहे. याचा शुभारंभ मंगळवारी केंद्रीय मंत्री रस्ते नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते.

विज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने प्रगती होत असून त्या मध्यमाने नवीन तंत्रज्ञान देखील नित्य-नेमाने उपलब्ध होत आहे. समाजातील तरुण आणि विद्यार्थी वर्ग या नवीन आयुधांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून या वर्गाने विशेषतः मह मेट्रोच्या या व्हाट्सअ‍ॅप तिकीट प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले.

आणखी वाचा-नागपूर- आरमोरी महामार्गाच्या रुंदीकरणाला वनखात्याचा विरोध, काय आहेत कारणे?

दररोज सुमारे ४०% मेट्रो प्रवासी मोबाइल ऍप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डसह सारख्या अनेक पर्यायाचा वापर करतात त्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप तिकीट प्रणालीच्या माध्यमाने आणखी भर घालण्यात आली आहे. महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. आतापर्यंत ८५ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी महाकार्ड प्राप्त केले असून आहेत.सरासरी प्रतिदन १०० महा कार्ड खरेदी करत आहे. या व्यतिरिक्त पेमेंट करण्याकरिता क्यूआर कोडचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात आहे. त्यासोबतच महामेट्रोद्वारे दर शनिवार आणि रविवारी महा मेट्रो मेट्रो प्रवाशांसाठी भाड्यात ३० टक्के सवलत महा मेट्रोच्या वतीने देण्यात येत असून या व्यतिरिक्त राजपत्रित सुटयांचा दिवशी देखील ३०टक्क सवलत मेट्रो प्रवाश्याना देण्यात येत आहे.

आणखी वाचा-राज्यातील शेकडो शिक्षकांवर पुन्हा अतिरिक्त होण्याची वेळ, काय आहे कारण वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे करा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तिकीट बुक

तुम्हाला क्युआर कोड सर्व नागपूर मेट्रो स्टेशनवर ठेवलेले आढळतील, तो स्कॅन करा किंवा +918624888568 या क्रमांकावर “हाय” लिहून पाठवा तुमची बुकिंग लिंक उघडेल. तुम्ही दिलेल्या स्थानकांच्या सूची मधून तुम्हाला कुठून प्रवास करायचा आहे ते निवडू शकता जर तुम्हाला डेबिट कार्ड किंवा युपीआय पेमेंट पध्दत निवडू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुम्हाला व्हॉट्सॲपवर क्यू आर कोडसह तिकीट मिळेल, जे तुम्ही प्रवेश करण्यासाठी गेटवर स्कॅन करू शकता. हे सोपे, जलद आणि सोयीस्कर आहे.