नागपूर : केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध संस्थेकडून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती व व्यवसायिकांवर हल्ली नाहक खटले (केस) दाखल केले जातात, असा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून होतो. त्यातच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरातील एका कार्यक्रमात हल्ली कुणावरही नाहक केस लावले जात असल्याचे विधान केले. गडकरी नेमके काय बोलले जाऊन घेऊ या.
सी. ए. विद्यार्थ्यांच्या नागपुरातील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, कालच मला एका न्यायाधिकरणचे प्रमुख भेटले होते. त्यांना मी म्हटले तुम्ही एक काम करा. जे अधिकारी चुकीचे काम करतात. त्यांच्यामुळे संबंधित प्रकरणे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जाऊन सरकार हरते. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा. हे अधिकारी काही घेणे- देणे नसतांना नाहक संबंधितावर खटले दाखल करून त्रास देतात. हे केस लावण्याचे एकच कारण आहे. त्यांना प्रसाद मिळायला हवा. त्यामुळे असल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करू नकारवाई झाल्यास कुणालाही कुणी अधिकारी पुढे त्रास देण्याची हिंमत करणार नाही, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
सी. ए. पूर्वी दलालीचे काम….
पूर्वी बरेच सी. ए. दलालीचे काम करत होते. ते कुणाला कर्ज मिळवून देण्यासह वादात अडकलेल्या प्रकरणांचा निपटारा करून देत होते. परंतु तुम्ही (सी. ए. आणि त्यांची संघटना ) चांगले लोक आहात. तुम्ही नवीन पद्धतीने व्यवसाय वाढीसह इतरही गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. आता जीएसटी व आयकर विभागाचेही खूप डोके लावण्याचे काम राहिले नाही. त्यामुळे समाज व नागरिकांना कसा फायदा होईल, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
चीनने देशाच्या विकासासाठी स्वत:ला बदलले…
चीनमध्ये कम्युनिस्ट विचारांचा जोर आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असतांना चीनकडून मला भेटीचे आमंत्रण मिळाले होते. त्यावरून मी चीनला गेलो. तेथील शंघाई शहरात नवीन शहर वसवले आहे. तेथे एनआयआर संवर्गातील उद्योजकांचा बोलबाला आहे. मी तेथील प्रमुखांना म्हणालो, तुम्ही कम्युनिस्ट विचारांचे होते. परंतु आता फक्त तुमचा लाल झेंडाच दिसतो. त्याशिवाय कम्युनिस्ट विचाराचे काहीही दिसत नाही. त्यावर त्यांनी मला देश व नागरिकांच्या विकासासाठी स्वत:मध्ये काही बदल केल्याचे कबूल केल्याचेही गडकरी म्हणाले.
आता पूर्ण पैसा कसा खर्च करावा याची चिंता…
रस्ते निर्माणसह इतर कामासाठी बीओटी व इतर नावीन्यपूर्ण प्रयत्नामुळे खुप पैसा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्पासाठी पैसे कुठून आणणार ही चिंता नाही. तर आमच्याकडील (खात्यातील) पैसा पूर्ण खर्च कसा होणार, ही चिंता असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.
धोकादायक वास्तूंचे काय होणार…
शहरात धोकादायक वास्तू आढलल्यास तेथे इमारती अथवा पुलांना बॅरिकेड लावणे किंवा सील करणे. त्याची तातडीने दुरुस्ती किंवा पाडकाम सुरू करणे. जास्त जोखम असलेल्या इमारतींमधून रहिवाशांचे स्थलांतर करणे. धोकादायक क्षेत्रांमध्ये लोकांचा प्रवेश थांबवणे, हे उपायही महापालिकेकडून केले जाणार आहे.