scorecardresearch

मतदार संख्येत प्रथम क्रमांकावरील नागपूर मतदानात सर्वात शेवटी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात मतदार संख्येत पहिल्या क्रमांकावर (१६४८०) असलेला नागपूर जिल्हा मतदान टक्कवारीत (८१.४३ टक्के) सहा जिल्ह्यात सर्वात शेवटी आहे.

number one in the number of voters
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात मतदार संख्येत पहिल्या क्रमांकावर (१६४८०) असलेला नागपूर जिल्हा मतदान टक्कवारीत (८१.४३ टक्के) सहा जिल्ह्यात सर्वात शेवटी आहे. दरम्यान एकूण विचार करता निवडणुकीत झालेले ८६.२३ टक्के मतदान निवडणूक पूर्व अंदाज चुकवणारे ठरण्याची शक्यता आहे. 

शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यापैकी एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारीचा विचार करता नागपूर जिल्हा सर्वात शेवटी आहे. गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर ९१.५३ टक्के मतदान झाले. नागपूर जिल्ह्यामध्ये ४३ मतदान केंद्रांवर ८१.४३  टक्के मतदान झाले . भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर ८९.१५  टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर ८७.५८ टक्के मतदान झाले. वर्धा जिल्ह्यात  १४ मतदान केंद्रावर ८६.८२ टक्के मतदान झाले . चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर ९१ .५३ टक्के मतदान झाले.

हेही वाचा >>> नागपूर : “ते” तरुण संशोधनातच तरबेज नाहीत, तर….

 ३४ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात एकूण ३९ हजार ४०६ मतदार आहेत. यात २२ हजार ७०४ पुरुष  तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी आज एकूण ३४ हजार ३४९  मतदारांनी  मतदानाचा हक्क बजावला आहे.  यात २० हजार ६६३ पुरुष  तर १३ हजार ६८६  महिला मतदारांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३ हजार २११ मतदार असून आज ५६३ महिला आणि २ हजार ३७६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.नागपूर जिल्ह्यामध्ये  शिक्षक मतदारांची  एकूण संख्या १६ हजार ४८० असून आज ७ हजार ८२ महिला आणि ६ हजार ३३८ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ७९७ मतदार असून आज १ हजार ५३ महिला आणि २ हजार ३३२  पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा >>> नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती पुसून टाकण्याचा डाव!, भवन परिसर बचाव कृती समितीचा आरोप

गोंदिया जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८१ मतदार असून आज ९८९ महिला आणि २ हजार ४१० पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार ५७१ मतदार असून आज २ हजार ३८८ महिला आणि ४ हजार ५६९  पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  वर्धा जिल्ह्यात एकूण मतदार संख्या ४ हजार ८९४ असून आज १ हजार ६११ महिला आणि २ हजार ६३८  पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयातून मतदान पेट्या नागपूर येथील अजनी परिसरातील समुदाय भवनातील स्ट्राँगरुमकडे रवाना झाल्या आहेत.तेथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वा. पासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. 

शिक्षक मतदारसंघ मतदान

जिल्हा टक्के

नागपूर :८१ .४३

वर्धा : ८६.८२

चंद्रपूर :९१.८९

भंडारा :८९.१५

गोंदिया : ८७.५८

गडचिरोली:९१.५३

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 10:54 IST