नागपूर : जागतिक त्वचारोग दिनानिमित्त १३ जुलैला एकाच वेळी देशातील विविध भागात एकूण ८०० नि:शुल्क त्वचारोग व औषधी वाटप शिबिरांचे आयोजन भारतीय त्वचारोग संघटनेकडून (आयएडीव्हीएल) करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये याची नोंद व्हावी यासाठी या उपक्रमाचा तपशील पाठवला जाईल, असे शिबिराच्या मध्य भारतातील समन्वयक डॉ. श्रद्धा महल्ले यांनी सांगतले .

नागपुरात झालेल्या पत्रपरिषदे त्या बोलत होत्या. डॉ. महल्ले पुढे म्हणाल्या, सदर उपक्रमाअंतर्गत देशभरातील एक लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी केली जाईल. आजपर्यंत एकाच दिवशी मोफत शिबीराच्या माध्यमातून केलेली ही विक्रमी रुग्ण व शिबीरांची संख्या असेल. सदर उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये त्वचेच्या आजाराची जनजागृती केली जाईल. दरम्यान त्वचारोग अभ्यासक्रमात त्वचा, नख, केस, सौंदर्य, लैंगिक आजार समस्या हे विषय इत्यंभूत आहे. परंतु हल्ली कुणीही या विषयाचा संबंध नसतांनाही नागरिकांना विशिष्ट क्रिमचा सल्ला देतो.

दरम्यान कुठलेही चुकीचे क्रिम लाऊन मुत्रपिंडावरही परिणाम शक्य आहे. या औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. परंतु सर्रास त्या नागरिकांपर्यंत पोहचतात. त्यामुळे नागरिकांमध्ये गंभीर परिणामही बघायला मिळत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठीही या जनजागृतीपर उपक्रमासह मोफत शिबीर व औषधोपचार उपक्रमाची मदत होणार असल्याचेही डॉ. महल्ले यांनी सांगितले. महाराष्ट्रात त्यापैकी सुमारे ७५ तर नागपुरातही १२ शिबीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चुकीचे क्रिम वापरल्याने त्वचा पातळ होणे (शोष), स्ट्रेच मार्क्स, रोसेसिया, पुरळ, पेरीओरलसह इतरही गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

बनावटी त्वचारोग तज्ज्ञांचा सुळसुळाट

नागपूरसह इतरही शहरात हल्ली बोगस त्वचारोग तज्ज्ञांचा सुळसुळाट झाला आहे. जाहिरातीत हे व्यक्ती सर्रास त्वचारोग बरा करण्याशी संबंधित दावा करतात. परंतु त्यांच्याकडे त्वचारोग तज्ज्ञांची शैक्षणीक अर्हताही नाही. देशात या खोट्या जाहिरातीवर प्रतिबंध घालणारा कायदा नसल्याने हे होत आहे. परंतु हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे. त्यामुळे त्याकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचेही डॉ. श्रद्धा महल्ले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात आठ शिबीर

त्वचारोग तज्ज्ञांकडून नागपुरात आठ शिबीर १३ जुलैला आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते दुपारी २ वाजता दरम्यान डॉ. प्रियांक मॅगिया यांच्या नेतृत्वात रामना मारोती मंदिर, डॉ. गौर खंडाईत यांच्या नेतृत्वात ए. बी. टाऊन, पारडी नाका, डॉ. सबा पठाण यांच्या नेतृत्वात ए. बी. एम. जीमच्या पुढे, जाफर नगर, डॉ. बुशरा खान यांच्या नेृत्वात ताज नगर, मानकापूर आणि रजा टाऊन, कामठी रोड येथे शिबीर घेणार आहे. तर सगळ्या सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही हे शिबीर होणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. श्रद्धा महल्ले यांनी केले आहे.