नागपूर : पेट्रोलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नागपूरकर आता नवी वाहने खरेदी करताना ई-वाहनांना (इलेक्ट्रिक वाहने) प्राधान्य देत असल्याचे या वाहनांच्या नोंदणी संख्येवरून स्पष्ट होते.

२०२०-२१ या वर्षात नागपुरात फक्त ६४७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. २०२१-२२ मध्ये ही संख्या ३ हजार ८८ तर २०२२-२३ या वर्षात ही संख्या तब्बल ११,८०७ वर गेली. ई-वाहनांसोबत ‘सीएनजी’ आणि ‘एलपीजी’वर चालणाऱ्या वाहनांचीही संख्या वाढत आहे. यात सर्वाधिक वाटा हा दुचाकी वाहनांचा आहे. पर्यावरणपूरक आणि पेट्रोल खर्चात बचत करणारी ही वाहने असल्याने नागपूरकरांचा कल ती खरेदी करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येते, असे विक्रेते सांगतात.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?

हेही वाचा – कैद्यांद्वारे निर्मित वस्तूंची आता ‘ऑनलाईन’ विक्री

दरम्यान, ई-वाहनांसोबतच ‘एलपीजी’वर धावणाऱ्या वाहनांचीही संख्या वाढत चालली आहे. २०२२-२३ मध्ये नोंदणी झालेल्या एकूण ७३,५६४ वाहनांपैकी चारशेवर वाहने ही एलपीजीवर चालणारी आहेत. ई-वाहनांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी करतात, त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र वरील आकडे सांगतात. ई-वाहनांची संख्या वाढत असली तरी ‘चार्जिंग सेंटर’चा मात्र तुटवडा आहे. मेट्रो स्थानकावर यासाठी सोय करण्यात आली असली तरी काही ठिकाणीच ही सेवा आहे. महापालिकेने नव्याने बांधकाम होणाऱ्या निवासी संकुलात चार्जिंग सेंटरसाठी जागा सोडण्याचा नियम केला आहे.