नागपूर – महालकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडत असाल तर कोणता मार्ग सध्या वाहतूक कोंडी मुक्त आहे, ते लक्षात घ्या. अन्यथा वाहतूक कोंडीत अडकून तुमचा तासभर नक्कीच वाया जाईल. मानेवाडा चौकाकडून महालमध्ये पोहोचायचे असल्यास ६ किमीचे अंतर कापण्यास तासभर लागू शकते. त्यामुळे दत्तात्रयनगर, छोटा ताजबाग, सक्करदरा या मार्गाने जाऊ शकता. सध्या या मार्गाने वाहतुकीची कोंडी नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दीसुद्धा नाही.

पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी शहरातील काही ठराविक रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्त्यांवरील वाहतूक दुसऱ्या रस्त्याकडे वळती केली आहे तर काही रस्त्यांवर दुरुस्तीचे काम सुरु आहे. इंदोरा, कामठी मार्ग, पाचपावली, जरीपटका आणि मानकापूरकडून महालकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पाचपावली पुलावरून जाण्यास हरकत नाही. सध्या या रस्त्यावर गर्दी नसून रस्ता जवळपास रिकामा आहे. कारण पुलावर सध्या वाहनांची गर्दी नसल्याने कोंडी निर्माण होणार नाही.

हेही वाचा – उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढणार; ‘या’ रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द

हेही वाचा – नभांगणी पाच ग्रहांचे विलोभनीय दर्शन, वाचा कधी आणि कुठून दिसणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदरमध्ये मंगळवारी बाजार चौकातून महालकडे जाताना लिबर्टी चौकाकडून जाऊ नका. पर्यायी मार्गाचा वापर करा. अन्यथा वाहतूक कोंडीत अडकू शकता. या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक कोंडी आहे. तसेच सायंकाळी महालमध्येसुद्धा मोठी गर्दी असते. सीताबर्डीतून महालकडे पोहोचायचे असेल तर कॉटन मार्केट रस्त्याने जाऊ नका, या रस्त्यावरही मोठी गर्दी आहे. वाहतूक कोंडी आहे. दिघोरी, उमरेड रोड, नंदनवन या परीसरातून महालकडे येणाऱ्या नागरिकांनी सक्करदरा पुलावरून रेशिमबाग चौकातून जावे. पुलावरील रस्त्याचा वापर करू नये. नेहमीप्रमाणे आजही त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे पुलाचा रस्ता सोपा असून खालील रस्ता वापरावा. सध्या इंदोरा, पाचपावली, महाल, मोक्षधाम मार्ग, माटे चौक, बुधवारी बाजार मार्ग आणि कृपलानी-रहाटे चौक या रस्त्याने वाहतूक कोंडी आहे. या कोंडीतून वाचण्यासाठी वाहनचालकांनी लहान रस्ता किंवा पर्यायी रस्त्याचा वापर करावा. जेणेकरून वाहतूक कोंडीतून वाचता येईल.