scorecardresearch

Premium

‘सिंगल गर्ल चाईल्ड’साठी मिळणार शिष्यवृत्ती, काय आहे योजना? वाचा…

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइतर्फे एकल बालिका शिष्यवृत्ती – २०२३ साठी नोंदणी सुरू झाली आहे.

scholarship for single girl child, single girl child cbse, cbse scholarship for single girl child, single girl child facilities
'सिंगल गर्ल चाईल्ड'साठी मिळणार शिष्यवृत्ती, काय आहे योजना? वाचा… (संग्रहित छायाचित्र)

वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसइतर्फे एकल बालिका शिष्यवृत्ती – २०२३ साठी नोंदणी सुरू झाली आहे. अशा विद्यार्थिनींना १८ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही. मंडळ या शिष्यवृत्तीसाठी कोणताही ऑफलाईन अर्ज तसेच कागदपत्रे स्वीकारणार नाही. मुलींना मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज करावा लागेल.

हेही वाचा : काय सांगता? चक्क पावसाळ्यात झाडाला लागले आंबे, तज्ज्ञ म्हणतात…

DNB Course Thergaon Hospital
पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात ‘डीएनबी’ अभ्यासक्रम, राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता
Scholarship applications pending colleges Government Medical College, Engineering chandrapur
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकीसह अनेक महाविद्यालयांकडे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित; सामाजिक न्याय विभागाचे…
Vidarbha Madhyamik Teachers Association
बाह्ययंत्रणेमार्फत शिक्षक भरतीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा विरोध; सरकारने पुनर्विचार करावा : आमदार अडबाले
MPSC
‘एमपीएससी’चा कारभार सुधरेना, आता तांत्रिक अडचणींमुळे शेकडो उमेदवार अर्जास मुकणार!

ज्या मुली अविवाहित एकट्याच आहेत, त्या पात्र ठरतील. मंडळाच्या संलग्न शाळांमध्ये अकरावी किंवा बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी अर्ज करू शकतात. तसेच ज्या विद्यार्थिनींना मंडळाच्या शाळेतून दहाव्या वर्गात पहिल्या पाच विषयांत ६० टक्के गुण मिळाले आहेत, त्याच पात्र ठरणार आहेत. मंडळाच्या वेबसाईटवरील होमपेजवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur scholarship for single girl child at cbse school registration started pmd 64 css

First published on: 24-09-2023 at 11:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×