जिल्हा व सत्र न्यायालयात मोक्का प्रकरणातील एक आरोपी काल (शुक्रवार) बेशुदध होऊन पडला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यास पोलिसांमुळे विलंब झाल्याचे समोर आले आहे . विजय रंहागडाले असे आरोपीचे नाव आहे. त्याला काल न्यायालयात आणले होते.

सुनावणीच्या प्रतीक्षेत तो बाहेर बाकावर बसलेला असताना, त्याला भोवळ आली आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर पोलीस त्याला तत्काळ रुग्णालयात हलवत नसल्याचे पाहून, अखेर वकिलांनी ही बाब संबंधित न्यायाधिशांच्या निदर्शनास आणून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना बोलावून आरोपीला तत्काळ रुग्णालयात हलवण्याची सूचना केल्यावर त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले.