scorecardresearch

नागपूर : वैद्यकीय सचिवांनी मेडिकल प्रशासनाला विचारला जाब – ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची तत्काळ दखल

आकस्मिक विभागापुढे तीन रुग्णवाहिका चालकांसह २४ तास उभ्या राहत असल्याचे अधिष्ठात्यांच्या निदर्शनात आले.

नागपूर : वैद्यकीय सचिवांनी मेडिकल प्रशासनाला विचारला जाब – ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची तत्काळ दखल
( संग्रहित छायचित्र )

मेडिकलच्या आकस्मिक विभागात रात्री येणाऱ्या रुग्णांना सीटी स्कॅनसाठी ट्रामा केअर सेंटरपर्यंत स्ट्रेचरवर भिजत जावे लागत असल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय सचिव सौरभ विजय यांनी मेडिकल प्रशासनाला जाब विचारला.

त्यावर अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी यापुढे प्रसंगी रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे आदेश संबंधितांना दिले. सौरभ विजय यांनी ‘लोकसत्ता’च्या वृत्ताच्या कात्रणाह डॉ. सुधीर गुप्ता यांना तातडीने उत्तर सादर करण्याची सूचना केली. त्यावर डॉ. गुप्ता यांनी क्ष- किरणशास्त्र विभागासह संबंधित विभागात विचारणा केली व त्यात रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत कळल्यावर त्यांनी सगळ्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली.

आकस्मिक अपघात विभागातच सीटी स्कॅन करा, येथे काही समस्या असल्यास व इतरत्र हलवायचे असल्यास रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध करण्यास त्यांनी सांगितले.आकस्मिक विभागापुढे तीन रुग्णवाहिका चालकांसह २४ तास उभ्या राहत असल्याचे अधिष्ठात्यांच्या निदर्शनात आले. त्यानंतरही केवळ समन्वयाअभावी या समस्या त्यांना कळवल्या जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.