scorecardresearch

Premium

विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

hail warning in vidarbh, hail warning in marathwada
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्याला "ऑरेंज अलर्ट" (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. तर आज सोमवारी विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज २७ या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच उद्यापर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
aromatic betel nuts Yavatmal
यवतमाळ : सुगंधित सुपारीच्या तस्करीसाठी ‘अंडे का फंडा’!
house burglary by thief
कोल्हापूर : परराज्यातील सराईत चोरट्याकडून घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
maharashtra weather update in marathi, maharashtra rain marathi news, chances of rain in maharashtra marathi news
राज्याच्या ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’

हेही वाचा : नौसैनेत अधिकारी होण्याचे अथर्वचे स्वप्न पूर्ण

रविवारी उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असून, किमानातही वाढ कायम आहे. विदर्भात मात्र गारठा वाढल्याचे चित्र आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur today hail warning in vidarbh and marathwada also orange alert in buldhana akola washim rgc 76 css

First published on: 27-11-2023 at 10:27 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×