नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक प्रवर्गातील निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून काही विशिष्ट संघटनाच्या प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या जवळ उभे राहण्यापासून अडवले जात आहे. हिंगणा येथील रायसोनी केंद्रावर मतदारांना विशिष्ट खोलीत नेऊन शिकाऊ मतपत्रिका देऊन काही विशिष्ट लोकांना मतदान करण्यासाठी धाक दाखवला जात असल्याची तक्रार आहे.

हेही वाचा: धक्कादायक! वर्षभरात नागपूर महापालिकेच्या ९ मराठी शाळा बंद

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
Rains in Morshi and Dhamangaon assembly areas
वर्धा: अंतिम आकडेवारीवर अवकाळी पावसाचे सावट
Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…

विद्यापीठ विधिसभेच्या शिक्षक, प्राचार्य, विद्यापीठ शिक्षक, संस्थाचालक प्रवर्ग, विद्वत परिषद व अभ्यासमंडळ निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरू झाले. मात्र या मतदानात गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार आहे. रायसोनी येशील मतदान केंद्रावर नुटा संघटनेचे काही प्रतिनिधी उभे असताना केंद्रावरील एका प्राचार्यांनी त्यांना उभे राहण्यास अडवले. मात्र इतर संघटनेच्या लोकांना उभे राहू दिले जात असल्याची तक्रार आहे. दुसरीकडे मतदारांना एका खोलीत नेऊन डमी मतदान पत्रिका वाटप करून कुणाला मतदान करायचे हे सांगितले जात असल्याची तक्रार आहे. शिवाय त्यांनाच मतदान न केल्यास नोकरीत समस्या निर्माण करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.