गडचिरोली : सूरजागड प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षल्यांनी धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. त्यावर आ. आत्राम यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आता नक्षल्यांनी पुन्हा एकदा तीव्र आक्षेप घेत राज – परिवारावर बहिष्कार टाका, असे आवाहन पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. नक्षल्यांच्या पश्चिम विभाग समितीचा प्रवक्ता श्रीनिवास याने हे पत्रक काढले आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. २०१९ पूर्वी आ. आत्राम यांनी सूरजागड प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. निवडून आल्यावर त्यांनी यु-टर्न घेतला. त्या परिसरातील ग्रामसभा व गावकऱ्यांना विश्वासात न घेता स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी हा प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला साथ दिली.

हेही वाचा: नागपूर: पती ऑटो घेऊन बाहेर पडला की पत्नी प्रियकराला घरी बोलवत होती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्या परिसरात आदिवासींचे शोषण सुरू आहे. आत्राम राजपरिवारदेखील कित्येक वर्षांपासून हेच करत आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम, भाजपचे माजी मंत्री अंबरीश आत्राम व भाग्यश्री आत्राम यापैकी कुणीही गावात आल्यास त्यांना जाब विचारा आणि त्यांचा निषेध करा, असे आवाहन नक्षल्यांनी या पत्रकातून केले आहे. गुरुवारी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील गाव पाटलाची हत्या केली होती. शुक्रवारी मध्यरात्री गट्टा परिसरात बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील दक्षिण गडचिरोलीतील हिंसक कारवाया बघता नक्षली पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे.