scorecardresearch

Premium

भंडारा : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराबरोबर मिळून काढला काटा; त्रिशंकू प्रेमातून नयनची हत्या

त्रिशंकू प्रेम प्रकरणातूनच नयनची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या हत्या प्रकरणात १९ वर्षीय प्रेयसीसह दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Nayan Khodpe murder
भंडारा : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराबरोबर मिळून काढला काटा; त्रिशंकू प्रेमातून नयनची हत्या (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

भंडारा : दुसऱ्या प्रियकरासोबत हत्येचा कट रचून प्रेयसीनेच पहिल्या प्रियकराचा घात केला. तिघांनी मिळून नयनचा गळा आवळून त्याची हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर रात्री हे दोघेही तरुण मद्यधुंद अवस्थेत नयनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घटनास्थळी आले. त्रिशंकू प्रेम प्रकरणातूनच नयनची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या हत्या प्रकरणात १९ वर्षीय प्रेयसीसह दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नयन मुकेश खोडपे, वय १९ वर्ष रा. पांढराबोडी याचा मृतदेह ३० नोव्हेंबर रोजी सकाळी नाल्यात सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नातेवाईकांच्या सांगण्यावरून काही संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचे कबूल केले. या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मंथन अशोक ठाकरे, वय १९ वर्ष रा.भोजपुर, मित्र साहिल शरद धांडे, वय १९ रा.ठाणा पेट्रोल पंप व प्रेयसी वय १९ रा. बीड सितेपार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेयसी आणि माझ्यामध्ये येऊ नकोस असे धमकावत पंधरा दिवसांपूर्वी मंथनने मृतक नयनसोबत पांढराबोडी गावालगत भांडण केले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबरपासून नयन बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
alexei navalny marathi news, alexei navalny death marathi news, russian opposition leader alexei navalny marathi news
अकस्मात मृत्यू की राजकीय हत्या? पुतिनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना संपवण्याचे कारण काय? जगभर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य काय?
kolhapur, two murder in kolhapur, kolhapur crime news,
कोल्हापूरात खूनाचे सत्र; कुडित्रेत मद्यपीकडून वृद्धाचा खून, इचलकरंजीत तरुणाची निर्घृण हत्या
boyfriend suicide nagpur
प्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात ३१८० महिलांना थायरॉईडचा विळखा; शहरासह ग्रामीण भागातही लोण; महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष

दिनांक २७ नोव्हेंबरला प्रेयसीने नयनला फोन करून भंडारा येथे बोलावून घेतले. तेथून नयन मोटासायकलने प्रेयसीला नांदोरा झीरी या पर्यटनस्थळी घेऊन गेला. दोघेही गप्पा गोष्टी करीत असताना दुपारी मंथन व साहिल एका मोटासायकलने तेथे आले. मंथनने नयनसोबत भांडण करून जबर मारहाण केली. एवढ्यावर ते थांबले नाही तर एका दुप्पट्ट्याने नयनचा गळा आवळून झाडाला बांधून त्याला मारहाण केली. नयनचा मृतदेह तसाच सोडून ते तिघेही ट्रीपल सीट भंडाऱ्याला आले. हत्येच्या रात्री आरोपी मंथन आणि साहिल दोघेही मित्र मद्यधुंद अवस्थेत पुन्हा नांदोरा झीरी येथे आले. झाडाखाली पडून असलेल्या नयनचा मृतदेह उचलून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पंडित नाल्यातील लहान पुलावरून गोसे धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्यात फेकून दिला. त्यानंतर दोघांनी नयनची मोटासायकल भंडारा तहसील कार्यालयाजवळील मोडक्या इमारतीजवळ फेकून दिली. मृतक नयनच्या नातेवाईकांनी सुरुवातीलाच मंथनवर संशय व्यक्त केला. त्या दिशेने तपास करीत पोलिसांनी मंथनला ताब्यात घेतले.

हेही वाचा – नागपुरात विमान प्रवाशांची संख्या ४१ टक्क्यांनी वाढली; राजकीय दौरे, पर्यटकांचा ओढा वाढल्याचा परिणाम

“मी एकाला आताच टपकवले आहे”…

नयनची हत्या केल्यानंतर दुसरा आरोपी साहील शरद धांडे हा सायंकाळी नशा करून ठाणा पेट्रोल पंप येथील पान टपरीवर आला. बेधुंद नशेत तो जोर जोराने ओरडून “मैने अभी अभी एक जण को टपकाया है” असे सांगू लागला. मात्र उपस्थितांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी नयनच्या खून प्रकरणाच्या बातम्या झळकल्या त्यानंतर साहिलच्या हत्येबाबत बोलल्याच्या चर्चा ठाणा पेट्रोल पंप येथे रंगल्या. दरम्यान पोलिसांनी साहिलला सकाळीच त्यांच्या घरून अटक केली. व युवती आरोपीस बीड सीतेपार येथून अटक करून गुन्हा ३०५/२३ कलम ३०२,२०१ दाखल करून पुढील तपासासाठी अटक केली. पुढील तपास ठाणेदार सुधिर बोरकुटे करीत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nayan mukesh khodpe murder due to love affair ksn 82 ssb

First published on: 02-12-2023 at 13:15 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×