scorecardresearch

Premium

नागपुरात विमान प्रवाशांची संख्या ४१ टक्क्यांनी वाढली; राजकीय दौरे, पर्यटकांचा ओढा वाढल्याचा परिणाम

उपराजधानी नागपुरात वेगवेगळ्या कामानिमित्त देश-विदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

air passengers increased Nagpur
नागपुरात विमान प्रवाशांची संख्या ४१ टक्क्यांनी वाढली; राजकीय दौरे, पर्यटकांचा ओढा वाढल्याचा परिणाम (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : उपराजधानी नागपुरात वेगवेगळ्या कामानिमित्त देश-विदेशातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय ताडोबा, पेंच, कऱ्हाडला, मध्य प्रदेशमधील पेंच, कान्हाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये-जा करणाऱ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढली आहे.

करोना काळात प्रवाशांची संख्या घटली होती. ही संख्या प्रत्येक महिन्याला ३० ते ४० हजारांपर्यंत खाली आली होती. आता मात्र, दर महिन्याला २.५ लाखांपर्यंत प्रवाशी संख्या वाढली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून) नागपूर विमानतळाहून १५ लाख २५ हजार ५२८ लोकांनी प्रवास केला. गेल्यावर्षी याच कालावधीत १ लाख ८० हजार ३८४ प्रवाशांनी प्रवास केला होता. म्हणजेच यावर्षी तब्बल १३,४५,१४४ अधिक प्रवाशांनी विमान प्रवास केला.

The number of leopards in India has now reached 13 thousand 874
बाबो, भारतात बिबट्यांची संख्या आता १३ हजार ८७४….
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
number of reserved seats in metro mumbai
मुंबई : मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना दिलासा मिळणार
Investment growth potential due to aviation services in Gondia
उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता

हेही वाचा – देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी डॉ. आंबेडकरांवर दबाव होता; माजी खासदार डी. राजा यांचे विधान

नागपूरहून देशाअंतर्गंत आणि परदेशात प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतदेखील मोठी वाढ दिसून येत आहे. मागील वर्षी पहिल्या सहामाहीत (२०२२) नागपूर येथून परदेशात प्रवास करणाऱ्यांची संख्या १९ हजार २५० होती. चालू वर्षात (२०२३) ४५ हजार २६७ प्रवासी परदेशात गेले. देशाअंतर्गत प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पहिल्या सहामाहीत १० लाख ६१ हजार १३४ प्रवासी संख्या होती. चालू वर्षात ही संख्या १४ लाख ८० हजार २६१ वर पोहोचली आहे.

हेही वाचा – गोंदिया जिल्ह्यात ३१८० महिलांना थायरॉईडचा विळखा; शहरासह ग्रामीण भागातही लोण; महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष

नागपूर विमानतळावर प्रवाशांची ये-जा वाढली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. – मो. अब्दुल आबिद रुही, कार्यकारी संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The number of air passengers increased by 41 percent in nagpur rbt 74 ssb

First published on: 02-12-2023 at 13:01 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×