नागपूर : महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणारे संभाजी भिडेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यांना अटक करण्याची मागणी केली.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यांची मालिका सुरू केली आहे. आता राजा राममोहन राॅय, महात्मा जोतिबा फुले यांना देशद्रोही संबोधले. शिर्डीचे साईबाबा यांना देव्हाऱ्यातून काढा, असे विधानही केले आहे. तर महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदनीय भाषेचा वापर केला. त्यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या आई-वडिलांबद्दल आपत्तीजनक विधान केले होते. यासाठी त्यांचावर अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे यांच्या बेताल वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपूर विभागात लागू केलेली ‘ई-पंचनामा’ प्रणाली काय आहे ?

हेही वाचा – वडेट्टीवारांची ‘पदोन्नती’ पटोलेंसाठी धोक्याची घंटा? प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे जाणार असल्याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी अविनाश गोतमारे, पंकज ठाकरे, नूतन रेवतकर, संतोष सिंह, रिजवान अंसारी, राजू सिंग चौहान, प्रशांत बनकर, आशुतोष बेलेकर, मिलिंद वाचनेकर, दिनकर वानखेडे, विनय मुदलीयार, नीलेश बोरकर, अश्विन जवेरी, बंटी अलेक्झांडर, अनिल पौनीपगार उपस्थित होते.